Latest Marathi News

BREAKING NEWS

“मी केलेली कामे सुप्रिया सुळेंनी आपल्या प्रचार पुस्तकात छापली अन् श्रेय घेतलं” अजित पवार

0

 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे महायुतीची सभा पार पडली. या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर सडकून टीका केलेली आहे. ‘मी केलेली विकास कामे सुळे यांनी आपल्या प्रचार पुस्तकात छापली आणि त्याचं श्रेय घेतलं’, अशी टीका करत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर आरोप केला आहे.

“आजवर जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. याही निवडणुकीत माझ्या पाठीशी उभी राहिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून देताल, तसेच माझ्याकडे काही कार्यकर्ते आले आणि म्हणाले की, दादा तुम्ही केलेली काम आताच्या खासदारांनी त्यांच्या कार्य अहवालाच्या पुस्तिकेमध्ये छापली आहेत. मी केलं, मी केलं. आहो, मी बारामतीमधील सर्व इमारती बांधल्या आहेत. मी हे केलं, हे केलं. तर मग भोर,वेल्हा या तालुक्यामध्ये काय काम केली. हे पण सांगाव? पण त्यांनी या दोन्ही ठिकाणी काहीच काम केल नाहीत.”

“एमआयडीसीच्या मुद्द्यावरती 2014 ला मत मागितली. मात्र हे एमआयडीसीच काम पूर्ण केलं नाही. तरीदेखील तेच लोक 2019 ला मत मागायला आले होते आणि आताही मत मागत आहेत. मी असतो तर मला लाज वाटली असती. कोणत्या तोंडाने मत मागता आहेत? तुम्ही लोकांनी त्यांना १५ वर्ष निवडून दिले. पण तुम्हाला काहीच मिळाले नाही.पण आज मी तुम्हाला म्हणतो की, यांना (सुनेत्रा पवार) एकदा निवडून द्या, त्यांचं काम नक्कीच दिसून येईल’, असं म्हणत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.