Latest Marathi News

BREAKING NEWS

रोहित पवारांनाही आवरता आला नाही हुरडा खाण्याचा मोह

0

शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट टाकत असतात. मविआ सत्तेत असताना आपल्या विविध प्रतिक्रिया आणि ट्विट्समुळेही ते चर्चेत असतात.सध्या त्यांची चर्चा पुन्हा एकदा होते आहे कारण हुरडा खायचा मोह कसा आवरला नाही ते काही फोटोंमधून सांगताना पाहायला मिळाले.

थंडी आणि हुरडा हे एक समीकरणच आहे. आज दौरा संपवून परतीच्या वाटेवर असताना एक भगिनी हुरडा विकताना दिसली. ते पाहून हुरडा खाण्याचा मोह आवरला नाही. असे कॅप्शन देत रोहित पवार यांनी काही फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंमध्ये आमदार रोहित पवार हे हुरडा विकणाऱ्या ताईकडून हुरडा विकत घेऊन तो खाताना दिसत आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडिया चांगलेच वायरल होताना दिसून येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच रोहित पवार आणि सदाभाऊ खोत यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. भाजपाचे नेते प्रसिद्धीसाठी आंदोलनात सहभागी झाले आहेत अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली होती आणि विद्यार्थी आंदोलनावर भाष्य केले होते. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी रोहित पवार हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. त्यांच्याच सरकारच्या काळातच असे निर्णय घेतले गेले की विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या असं म्हणत त्यांना उत्तर दिलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.