Latest Marathi News

BREAKING NEWS

तर चार-पाच दणकट पोरं सोबत घेऊन अधिकाऱ्यांना भेटत जा..!!थोरातांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला वाचा.

0

सोलापूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे. अधिकाऱ्यांवर वाचक ठेवायची असेल तर दणकादणकी करा. ऐकत नसेल तर चार-पाच दणकट पोरं सोबत घेऊन अधिकाऱ्यांना भेटत जा. सतत आमच्याकडेच यायला पाहिजे असं नाही, असा अजब सल्ला त्यांनी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

सोलापूर मध्ये काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी हा अजब सल्ला दिलेला आहे. पुढे बोलताना थोरात म्हणाले की, मी अनके जिल्हे फिरलो. पण अधिकारी ऐकत नसल्याची तक्रार पहिल्यांदाच ऐकली. बाकीचे लोक तिथल्या तिथं प्रश्नमार्गी लावतात. आपलंच कुठं तरी चुकतंय हे कळायला पाहिजे. तुमचाही धाक दाखवा. धाक निर्माण केला पाहिजे, असं बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपला धाक असावा. चुकीचं काम करता येणार नाही, याची भावना अधिकाऱ्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक गोष्ट रिमोट कंट्रोलवर चालत नाही. तुम्ही तक्रार करायची आणि आम्ही अधिकाऱ्यांना निलंबित करायचं असं चालणार नाही. अधिकाऱ्यांवर केवळ मंत्र्यांचा धाक असून चालणार नाही. तुमचाही धाक असायला हवा, असा अजब सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.