Latest Marathi News

BREAKING NEWS

बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज 1981 बॅच चे मित्र ४४ वर्षांनी पुन्हा एकत्र

0

*बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज* 1981 बॅच चे मित्र ४४ वर्षांनी पुन्हा एकत्र आलेजिथे जुने मित्र व मैत्रिणी एकत्र येतात हास्य आणि आठवणी च्या वातावरणात भरून जातात.१ एप्रिल २०२५ रोजी पुणे येथील कर्वे रोडवरील किमाया व्हेज रेस्टॉरंटमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमा साठी पुढाकार शोभा कुलकर्णी यांनी घेतला. मुख्य आयोजक शोभा कुलकर्णी, किशोर बडवे, प्रदीप दीक्षित आणि सुनील झाडबुके होते.मेघा परंडकर दुबईहून, संध्या भा॔बुरे मुंबईहून आणि सुखदेव दिवटे बार्शीहून आले होते.कार्यक्रमात इतर महाविद्यालयीन मित्र आणि मैत्रिणी शोभा बाबर, मंजू रंगदाळ, सुषमा बुरगुटे, राजेंद्र केसकर आणि धन्यकुमार सोले सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात श्री भगवंताची पूजा आणि नंतर महाराष्ट्रीयन शैलीतील ओवाळणे आणि गजरे व लाल गुलाब देऊन स्वागत केले. एकमेकांची ओळख करून दिली आणि नंतर सर्वांनी त्यांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास सांगितला आणि कथा, आठवणी आणि अनुभव सांगितले. काॅलेज जीवनातील सर्वांनी आपआपल्या आठवणी सांगितल्याया मेळाव्यात स्वागताला थंडगार जलजिरा पेय नंतर स्वादिष्ट जेवण, आणि उत्साही संगीताचा समावेश होता, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साह कायम राहिला.”आम्ही वर्षानुवर्षे प्रत्यक्ष काहीजण भेटलो नव्हतो, पणसोशल मिडियामुळे देश विदेशातील मित्र, मैत्रिणींना संपर्क करणे सोपे झाले आहे वाॅटसॅप ग्रुप मुळे नियोजन सहज शक्य झाले .वेळ कसा गेला कळलेच नाहीआठवणीच्या गप्पांना वेळ कमी पडला असे प्रदीप म्हणाला सुनीलने जुन्या आठवणी सांगितल्या ज्यामध्ये “आम्ही हसलो, विनोद केला आणि जुन्या काळाची आठवण काढली.”कार्यक्रमाचे ठळक मुद्दे असे होते.१. सुखदेवच्या गायनातील लपलेल्या प्रतिभेची ओळख झाली 2. प्रदीप सूत्रसंचलन उत्कृष्ट होते आणि कविताही.३. मित्रांवर शोभा चे कविता वाचन खूप छान झाले ४. शोभा आणि मेघा च्या गायना मुळे माहोल तयार झाला सर्वांनी एकत्र खूप आनंद घेतला आणि पुढचा मेळावा बार्शी येथे होईल जिथे सुखदेव स्वेच्छेने म्हणाला की तो सर्व व्यवस्था करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.