Latest Marathi News

BREAKING NEWS

७५व्या वर्षी डॉ.अंधारे यांच्या रूपाने झाले विठ्ठलाचे दर्शन – बाळासाहेब सावधनकर, बोर्डी. वेळेत उपचार मिळाल्याने वारकऱ्यास मिळाले जीवनदान

0

बार्शी : ७५ वर्षांचे #विठ्ठलभक्त वारकरी #एकादशी निमित्त #पंढरपूरला चालले होते. वाटेतच त्यांना #कुर्डूवाडीजवळ हृदयविकाराचा तीव्र #झटका आला. त्यांना तातडीने उपचारांसाठी तेथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी बार्शी येथील डॉ.संजय अंधारे यांच्या #सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

हाॅस्पिटल मध्ये आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचे आढळून आले, लघवीचे प्रमाण देखील कमी झाले होते आणि रक्तदाबसुद्धा कमी झाल्याचे दिसून आले.

सदरील पेशंट हे महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या गावातील आहेत हे समजल्यानंतर डॉ.अंधारे यांनी त्यांच्या पी.ए ला पेशंटच्या परिस्थितीची माहिती दिली. आरोग्य राज्यमंत्री महोदया यांचे मेहुणे असलेले बार्शीतील अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्याशीही डॉ.अंधारेनी रूग्णाच्या परिस्थितीविषयी चर्चा करून त्यांना योग्य ते उपचार सुरू असल्याचे सांगितले.

रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाच्या परिस्थितीची माहिती दिली आणि त्यांना पुढील उपचारांची दिशा सांगितली.
त्यांना धीर दिला आणि पैशाची काळजी करू नका आपल्या हाॅस्पिटलमध्ये ह्रदय शस्त्रक्रिया म्हणजे ॲन्जियोप्लास्टी हे उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत होतात असे सांगितले.

सुरुवातीला पेशंटचे बी.पी नाॅर्मल होण्याचे औषध सुरू केले तसेच ऑक्सिजन लावला आणि पेशंटला अतिदक्षता विभागांमध्ये ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सुश्रुत हॉस्पिटलच्या कॅथलॅब सेंटर मध्ये सकाळी ॲन्जियोग्राफी करण्याचे ठरले.

बार्शीतील #ह्रदयरोगतज्ञ डॉ.#विकास_खामकर यांनी अॅन्जियोग्राफी केली असता त्यांच्या ह्रदयाच्या रक्तवाहिनीमध्ये एक मोठी गुठळी झाली आहे असे दिसून आले. ती गुठळी (Block ) काढून टाकण्यासाठी लगेच अॅन्जियोप्लास्टी करण्यात आली. आणि त्यानंतर त्यांना अतिदक्षता मध्ये ठेवण्यात आले.

वेळेवर उपचार मिळाल्याने आणि त्यांच्या शरीराने देखील उपचारास योग्य प्रतिसाद दिल्याने त्यांची तब्येत झपाट्याने सुधारली व पाच दिवस अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात आला.

त्यांचे करण्यात आलेले सर्व उपचार महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात आले.

डिस्चार्ज करताना विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री बापूसाहेब कदम यांच्या हस्ते पेशंटचा सत्कार करण्यात आला.रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना मिळालेल्या उपचारांबद्दल व सुश्रुत हॉस्पिटल मधील सहकार्याबद्दल डाॅ. संजय अंधारे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.