Latest Marathi News

BREAKING NEWS

वसतिगृह प्रवेश प्रक्रिया आणि नियमन यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक संपन्न

0

मुंबई, १८ मार्च : आज मंत्रालयात वसतिगृह प्रवेश प्रक्रिया आणि नियमन यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत आणि पूरक सुविधांबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.

चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत यावेळी विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वसतिगृहांमध्ये स्वच्छता, जेवणाची व्यवस्था, पाण्याची सुविधा, बेड अशा आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव संतोष खोरगडे, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.