Latest Marathi News

BREAKING NEWS

साक्षात शिवरायांच्या वारसाकडून शौर्याचे प्रतीक असलेली तलवार स्वीकारताना अंगावर रोमांच उभे राहिले – चंद्रकांत पाटील

0

मुंबई |

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल मंत्रालय येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

याभेटीदरम्यान पाटील आणि छत्रपती उदयनराजे यांच्या दरम्यान विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाटील यांना ऐतिहासिक तलवार भेट दिली. या अनोख्या भेटीसाठी पाटील यांनी खासदार छत्रपती उदयनराजे यांचे फेसबुक पोस्टद्वारे विशेष आभार मानले.

संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आदर्श लोकराज्याचा वस्तुपाठ महाराजांनी घालून दिला. छत्रपती खा. उदयनराजे हे शिवरायांचे थेट वंशज. आज भेट झाली असता, त्यांनी तलवार दिली. साक्षात शिवरायांच्या वारसाकडून शौर्याचे प्रतीक असलेली तलवार स्वीकारताना अंगावर रोमांच उभे राहिले.धन्यवाद छत्रपती खा. उदयनराजे! असे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.