Latest Marathi News

BREAKING NEWS

अरविंद केजरीवाल ही पंतप्रधान मोदींची खरी अडचण, मनीष सिसोदिया याचा थेट आरोप

0

 

दिल्लीत शिक्षण आणि इतर विभागांमधील चांगलं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडत नाही. त्यामुळेच ते रोखलं जातंय. दिल्लीत केजरीवाल आरोग्य आणि शिक्षणात जे काम करतायत, त्याचा तर मोदींनाही गर्व वाटला पाहिजे, मोदी अरबपती मित्रांसाठी काम करतात. देशानं त्यांना एवढं बहुमत दिलं पण अशा प्रकारे चांगलं काम रोखणं त्यांना शोभत नाही, असं वक्तव्य दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलं.

सीबीआयने शुक्रवारी मनीष सिसोदिया यांचे राहते घर आणि इतर 30 ठिकाणी धाडी टाकल्या. त्यामुळे आम आदमी पार्टी आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्ससारखी वृत्तपत्रे दिल्लीतील कामाची दखल घेतात पण केंद्र सरकारतर्फे येथील राज्यकर्त्यांना त्रास दिला जातो, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल केला होता.

आज उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली.अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्समध्ये दोन बातम्या आल्या आहेत. एक बातमी नवी दिल्लीच्या शिक्षण प्रणालीच कौतुक करणारी आहे तर तर दीड वर्षांपूर्वी एक बातमी कोविड काळात गंगा नदीत कशा पद्धतीने लाखो प्रेतांचा ढीग लागला होता.. याची बातमी आहे. भारतीय म्हणून आम्हाला शरम वाटली होती. पण दिल्लीच्या शिक्षणाच्या मॉडेलचं कौतुक केल्यानंतर आमच्यासाठी ही गर्वाची बातमी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.