मुंबई |
आजही ते माझं दैवत आहे आजही ते श्रद्धास्थान आहे. एखादा माणूस नोकरीला लागला की ५८ व्या वर्षी रिटायर होतो. राजकीय जीवनात असेल तर भाजपमध्ये ७५ व्या वर्षी रिटायर केलं जातं. चुकलं तर सांगा अजित तुझं चुकलं, चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ असे प्रतिपादन अजितदादा पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून अनेक चर्चांना उधाण आले होते. अशातच, आज अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांनी ही वेळ आपल्यावर का आली? हा प्रश्न मांडत भाषणाला सुरुवात केली. यावेळी शरद पवार यांच्या बदललेल्या भूमिकेवर अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला.
अजित पवार यांनी शरद पवार यांचे राजकारण कसे सुरु झाले, त्यानंतर देशपातळीवर परिस्थिती कशी बदलत गेली? हे सांगताना काळाप्रमाणे बदल केले पाहिजे, असे सांगितले. ते म्हणाले, देशात जनता पक्ष आज कुठे आहे? कारण ते बदलत गेले नाही. मी साहेबांमुळेच घडलो. माझे राजकारण त्यांच्याशिवाय नाही.