Latest Marathi News

BREAKING NEWS

‘अरे आदित्य खरा गद्दार तू आहेस, काका म्हणून पाठीत खंजीर खुपसला’

0

 

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर आता रामदास कदम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर सातत्यानं तोफ डागताना दिसताहेत. रामदास कदमांनी शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात थेट आदित्य ठाकरेंनाच लक्ष्य करत घणाघाती टीका केली.

शिवसेनेत बंडखोरी झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे ४० आमदार आणि खासदारही फुटले. काही जिल्हाप्रमुखांसह स्थानिक पातळीवरील नेतेही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या बाजूने केले. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी शिव संवाद यात्रा सुरू केली असून, शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना गद्दार म्हणून संबोधत आहेत. यावरूनच रामदास कदमांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलंय.

कार्यक्रमात बोलताना रामदास कदम म्हणाले, ‘आदित्य ठाकरे गद्दार तू आहेस. शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर रामदास कदमला कसं संपावयाचं हा एक कलमी कार्यक्रम मातोश्रीवर सुरू होता. शिवसेनाप्रमुखांचं निधन झाल्यानंतर रामदास कदमला कसं संपवायचं, हा कार्यक्रम सुरू होता. नाईलाजाने मला पर्यावरण मंत्रीपद दिलं. पर्यावरण मंत्री पद नव्हतंच. त्यांना वाटलं, ते खातं घेऊन बाजूला बसेल, त्यांना कुठे माहितीये की रामदास कदम पण आमचा बाप आहे’, असं उत्तर कदमांनी आदित्य ठाकरेंना दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.