Latest Marathi News

BREAKING NEWS

अंधेरीची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार, शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा

0


शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व येथील विधानसभेच्या जागेसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला काँगेस, राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा राहणार असून महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढवेल, अशी घोषणा आज्ता तिन्ही पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत रंगशारदा येथे करण्यात आली.

शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. 13 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, असे शिवसेना विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांनी सांगितले. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, राष्ट्रवादीच्या राखी जाधव उपस्थित होते.

कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पटोले यांनी आम्ही शिवसेनेसोबत आहोत असे पत्रकारांना सांगितले. आमचा हात निश्चितच त्यांच्यासोबत राहील. अडचणीतील मित्राला मदत करणे हाच आमचा धर्म आहे, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.