Latest Marathi News

BREAKING NEWS

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0

महाराष्ट्रात सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणूक २०२२ ची चर्चा आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला असताना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली.

ही निवडणूक ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार होता. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपकडून या निवडणुकीत झुंजार नेते मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती , तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्व. आ. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती.

दरम्यान,मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.