Latest Marathi News

BREAKING NEWS

आम्ही कुणीही शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात नाही – सदा सरवणकर 

0

 

 

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला हादरा बसला. त्यात शिवसेना भवन ज्या मतदारसंघात आहेत त्यातील आमदार सदा सरवणकर हेदेखील शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्याविरुद्ध शिवसैनिक संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावर राष्ट्रवादी हा पक्ष सरकारमध्ये अग्रगण्य आहे. हा पक्ष आपली कामे करत नाही हे वाटल्यामुळेच शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असं सदा सरवणकर यांनी भाष्य केले आहे.

 

सदा सरवणकर म्हणाले की, मी एकनिष्ठ हा मतदारांशी आहे. मतदारांची कामे होणार असतील तर मला आनंद आहे. आम्ही कुणीही शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात नाही. मतदारसंघातील कामे होणार नसतील तर वेगळा मार्ग शोधावा असं वाटलं. जे कुणी आंदोलन करतायेत. मी विभागप्रमुख असल्याने ज्यांना पदे मिळाली नाहीत ती लोकं आहेत. सर्वसामान्यांची कामे होत नव्हती. आमदाराची घुसमट होत होती हे अनेक शिवसैनिकांना माहिती आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी काहीजण पुतळे जाळण्याचं काम करत आहेत असं त्यांनी सांगितले.

 

तसेच मी जनतेचा आमदार आहे, माझ्या विभागातील कामे होणार नसतील तर मी मतदारांसमोर जाणार कसं? माझ्या मतदारसंघात शिवडी रस्ता बनतोय, त्यात ३ हजार कुटुंब बाधित होत आहेत. या कुटुंबाला दुसरीकडे स्थलांतरित केले जात आहे. कुठलीही व्यवस्था न होता त्यांची घरे तोडली जाणार असतील तर त्यांना उत्तरं काय देणार? मतदारसंघातील लोक आक्रोश करत आहेत. सेना भवनाच्या बाजूला ५ हजार कुटुंब गेली १० वर्ष यातना सहन करतायेत, ५० पत्रे शासनाला दिले कुणीही मार्ग काढायला तयार नाही. आमदार म्हणून मी आणखी काय करायला हवं होतं? असा सवालही सरवणकरांनी विचारला.

Leave A Reply

Your email address will not be published.