मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिंदे,फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची चर्चा होती. मात्र हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळचा विस्तार होण्याची शक्यता दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनासाठी आपल्याकडील अतिरिक्त खात्यांचा पदभार इतर मंत्र्यांकडे सोपवला आहे.
त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा अधिवेशनानंतरच होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. सूत्रांकडून देखील तशी माहिती समोर आली आहे. अमित शाह यांच्यासोबत बैठक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या मंत्री पडलात कोणाची वर्णी लागणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.