बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात फूट पडणार नसल्याचे बोलले जात होते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबात तणाव वाढल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पाडव्याला पवार कुटुंब कार्यकर्त्यांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देत असे. पण यंदा अजित पवारांनी गोविंदबागेऐवजी काटेवाडीत कार्यकर्त्यांची भेट घेत वेगळा मार्ग स्वीकारला. आता भाऊबीजेसंबंधी अजित पवारांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती ग्रामीण भागात विविध गावांचा दौरा करत आहेत. सकाळी सात वाजता त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात वंजारवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून केली, तसेच त्यांना दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर ते रुई या गावात पोहोचले, जिथे त्यांनी सभा घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला, याचे स्पष्टीकरण दिले. एका बाजूला निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच, दुसऱ्या बाजूला भाऊबीजेच्या निमित्ताने सुप्रिया सुळेंकडून अजितदादांची ओवाळणी होणार का, याची उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे.
हेही वाचा – बारामतीत पवार कुटुंबाचा विभाजित पाडवा; शरद पवार गोविंदबागेत तर अजित पवार काटेवाडीत नागरिकांना भेटणार
सुप्रियाला ओवाळणी देणार, अजितदादांनी म्हटले…
परंपरेनुसार पवार कुटुंबाची भाऊबीज गोविंदबागेत पार पडणार आहे. मात्र, अजित पवार या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात आहे. गाव भेट दौऱ्यात अजित पवारांना याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं, ‘आज सकाळी माझ्या बहिणी मला ओवाळायला घरी आल्या होत्या, त्यांच्याकडून मी ओवाळणी घेतली आणि मगच बाहेर पडलो.’ त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, ‘माझं आज २५-३० गावांचं नियोजित दौरे आहेत, त्यामुळे या विषयावर बोलण्यासाठी वेळच नाही.