Latest Marathi News

BREAKING NEWS

अबू आझमी यांचे हे वाक्य ऐकल्यावर विधानसभेच्या अधिवेशनात पुन्हा एकदा गदारोळ झाला.

0

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या आठवड्यात ‘वंदे मातरम’वरून मोठा गदारोळ झाला होता. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही असं वक्तव्य केल्यामुळे भाजपा आणि शिंदे गटातील आमदार आक्रमक झाले होते. दुसऱ्या बाजूला ‘वंदे मातरम’ हे धार्मिक गीत नाही तर देशगीत आहे. त्यामुळे आझमींची ही भावना अयोग्य आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. दरम्यान, अबू आझमी यांच्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात आज पुन्हा एकदा गदारोळ झाला.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे आता तमाशातले…”,गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त टीकेने वादाला तोंड फुटले

हेही वाचा : “वादग्रस्त विधानाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत माफी मागितली”

हेही वाचा : …अन्यथा रस्त्यांवरील खड्ड्यात वृक्षारोपण करुन आंदोलन करणार

काश्मीर आणि काश्मिरी पंडितांबद्दल बोलताना अबू आझमी म्हणाले, कश्मीरमध्ये फक्त ८९ पंडितांची हत्या झाली. आझमी यांचं हे वाक्य ऐकल्यावर पुन्हा एकदा भाजपा आमदार आक्रमक झाले. भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि अबू आझमी यांच्यात यावरून वाद सुरू झाला. तसेच, अबू आझमी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनीसुद्धा आक्षेप घेतला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.