Latest Marathi News

BREAKING NEWS

आदित्य ठाकरेंच्या गाडीवर झालेला हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून

0

ज्युवेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या (संभाजी नगर) औरंगाबादमधल्या शिवसंवाद यात्रेमध्ये गाडडफ़ेक करण्यात आली. या झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला आहे.आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार आहे, त्यामुळं काही लोकांनी जाणीवपूर्वक एकत्र येऊ नये म्हणून हे असले प्रकार करत असल्याचे दानवे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

आमदार आदित्य ठाकरे हे सध्या (संभाजी नगर) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. माई रमाई यांच्या जयंतीनिमित्त सुरु असलेला डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्याने किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे.

यादरम्यान काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचेही समोर आले आहे. त्याशिवाय काही लोकांनी पपईचे तुकडे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर फेकल्याचं समोर आले आहे. याप्रकारामुळे त्याठिकाणी तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पक्षाची ताकद वाढवण्यातही प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसंवाद आणि महाप्रबोधन यात्रा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे दोन्ही कार्यक्रम राज्यात ठिकठिकाणी राबवित आहेत. औरंगाबाद येथून आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सरु झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.