Latest Marathi News

BREAKING NEWS

२ हजार कोटीचे उत्पादन देणाऱ्या कोकण रेल्वेचे दोन ट्रॅक कधी होणार ? – सतीश नारकर

0

रत्नागिरी | मागच्या काहीच दिवसांपूर्वी देशाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला होता या अर्थसंकल्पामध्ये रेल्वे प्रशासनाकडून नव्या रेल्वे लाइनसाठी कोटीच्या तरतुदी करण्यात आल्या असून यामध्ये पुन्हा एकदा कोकण रेल्वेच्या पदरी निराशा पडली आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री सतीश रत्नाकर नारकर यांनी नाराजी व्यक्त करत दरवेळीप्रमाणे यंदाही रेल्वेच्या अर्थसंकल्पात कोकणावरचं अन्याय का? असा सवाल केंद्र सरकार व केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला विचारला आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, कोकण रेल्वेला या वर्षी २५ वर्षे होऊन सुद्धा आजही कोकण रेल्वे एका ट्रॅक वरूनच धावते आणि त्यात ही वर्षाकाठी दोन हजार करोड पेक्षा जास्त उत्पन्न रेल्वे मंत्रालया देते आहे, पण तिच्यासाठी #AmritKaalBudget मध्ये काहीच नाही? कोकण रेल्वे दोन ट्रॅक होणार कधी? असा सवालच त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. तसेच थेट कोकण रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्रालयाला टॅग केले आहे. या पूर्वी सुद्धा सतीश नारकर यांनी कोकण रेल्वेच्या विकासाच्या मुद्द्यावरून वेळोवेळी आवाज उठवला होता.

राज्यातील नवीन रेल्वे मार्गिका मार्ग – तरतूद (आकडे कोटींत) प्रमाणे कल्याण-मुरबाड (उल्हासनगरमार्गे-२८ किमी)- १००, अहमदनगर-बीड-परळी (२५० किमी)- २०१, वर्धा-नांदेड (पुसदमार्गे-२७० किमी) – ६००. सोलापूर-उस्मानाबाद (तुळजापूरमार्गे-८४ किमी)- ११०, बारामती-लोणंद (५४ किमी)- १००,फलटण-पंढरपूर (१०५ किमी) – २० अशी तरतूद करण्यात आली असून या तरतुदीमध्ये पुन्हा एकदा कोकण रेल्वेच्या विकासाला डावलण्यात आले आहे यावरूनच त्यांनी केंद्रातील रेल्वे प्रशासन आणि कोकण रेल्वे प्रशासनाला जाब विचारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.