Latest Marathi News

BREAKING NEWS

कसा टाळ हुकला.. गंध उलटा उठला‌.‌‌.. वारकरी तुझा रस्ता मुकला!

2

पंढरपूर : लाखो वारकऱ्यांच्या मनाची घालमेल व्यक्त करणाऱ्या भावना, “कसा टाळ हुकला.. गंध उलटा उठला.. भक्तांचा बांध फुटला.. वारकरी तुझा रस्ता मुकला!”, या काव्यपंक्तीत आहेत. काल त्याचं भावांना अनुभवायला मिळाल्या.शेकडो वर्षांची पायीदिंडीची परंपरा जतन करणाऱ्या, वर्षानुवर्ष नेमाने पंढरीत दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या मनाची अवस्था घरबसल्या कशी झाली असेल, या प्रश्नाचे उत्तर काल पंढरपुरात आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मिळत होते.

कोरोना संकटाने आषाढी एकादशी वारीवर संचारबंदी लावल्यानंतर वारकरी संप्रदाय आणि उभ्या महाराष्ट्रात तुझ्या भावना व्यक्त झाल्या त्या भावनेला वाट करून देण्याचे काम आदर्श शिंदे आणि निनाद म्हैसकर यांच्या गीताने केले. ते गीत आणि आदर्श शिंदे याच्या आवाजातील दर्द वारकऱ्यांच्या भावना व वेदना मोठ्या ताकदीने प्रकट करतो.

कालच्या आषाढी एकादशी दिवशीचे पंढरीतील चित्र आणि आदर्श शिंदेचा स्वर यांच्यातील घटना ते डोळ्यात अश्रू उभे करते. इतिहासात ठळकपणे नोंदल्या जाणाऱ्या कालच्या आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात पत्रकार छायाचित्रकार सुनील उंबरे सारंग टाले आणि मल्लिनाथ गाडवे यांच्यासमवेत आढावा आणि अनुभव घेतला.

दरवर्षी लाखो वैष्णवांच्या साक्षीने आणि भक्तिरसाने दुमदुमून जाणाऱ्या पंढरीत संचारबंदीतील वारी कशी आहे याचा आँखो-देखा हाल टिपला. आम्ही तिथे असतानाच योगायोगाने खांद्यावर पताका घेऊन हरिनामाचा गजर करीत विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष गहिनीनाथ महाराज हे दाखल झाले. त्यांच्याही मनाची अवस्था जाणून घेण्याची संधी मिळाली.

अनेक पत्रकार मित्र पंचवीस-तीस वर्षापासून न चुकता श्रद्धेने वृत्तसंकलन करीत आले आहेत‌. त्यांचीही अस्वस्थता लपून राहत नव्हती. पत्रकारांची अशी अवस्था तर पिढ्या-न-पिढ्या आषाढी न चुकविलेल्या कुटुंबांची अवस्था कशी असेल, याची कल्पना न केलेली बरी! या सर्व परिस्थितीला अगदी मनाला भिडणाऱ्या शैलीत सुनील उंबरे यांनी एडिटिंग व डबिंग केलेला एक व्हिडिओ आपल्या पुढ्यात ठेवत आहे.पार्श्वभूमीचा आदर्श शिंदेचा दर्द भरा आवाज अश्रुचे बांध फोडल्याशिवाय राहणार नाही.

2 Comments
  1. Avinash, Pune says

    मी पंढरपूरला कधी आलेलो नाही. मी कुठल्याही मंदिरातील विठ्ठल पाहिलेला नाही. मी वारकरी नाही…तरीही गाणं ऐकताना अश्रूंचा बांध फुटला. काळीज फुटलं. बा विठ्ठला मी यंदा तुझ्या भेटीला येणार.

    1. Khamkya India says

      धन्यवाद अविनाशजी!

Your email address will not be published.