Latest Marathi News

BREAKING NEWS

अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराने निधन

0


मुंबई : प्रतिनिधी
कांटा गला गाणं आणि बिग बॉसमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचें निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला.

मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात राहणारी अभिनेत्री शेफाली शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास गंभीर आजारी पडली. छातीत दुखू लागल्याने पती आणि अभिनेता पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात पोहोचताच अभिनेत्रीला मृत घोषित करण्यात आले. सध्या तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला.

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक विकी लालवानी यांच्या इन्स्टाग्राम पेजने शेफाली जरीवालाच्या मृत्यूची पुष्टी केली. विकी लालवानी यांच्यानुसार, शेफालीच्या पतीने तिला अंधेरीतील बेलेव् ू रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टर तिच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच शेफालीचा मृत्यू झाला.

शेफालीने ३ दिवसांपूर्वी एक फोटोशूट देखील केले होते. सध्या शेफालीची शेवटची पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यापासूनही दूर असलेली शेफाली सोशल मीडियावर कायम सक्रिय होती.
शेफालीच्या निधनाची माहिती मिळताच तिच्या जवळच्या व्यक्तींना देखील मोठा धक्का बसला आहे. सिंगर मीका सिंग याने अभिनेत्राच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.