Latest Marathi News

BREAKING NEWS

अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करेपर्यंत राष्ट्रवादी गप्प बसणार नाही

0

खासदार सुप्रिया सुळेयांना शिवीगाळ करणारे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने कालपासून रान उठवलंय. सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. आता अब्दुल सत्तार यांना बडतर्के केल्याशिवाय राष्ट्रवादी गप्प बसणार नाही, अशी भूमिका पक्षातर्फे घेण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली.

मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून पुन्हा एकदा खालचा स्तर दाखवला आहे. मंत्रीमंडळात असणार्‍या अशा जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे आणि भारतातील संसदेत काम करणाऱ्या एका महिला खासदाराबाबत अशाप्रकारे बोलणे कितपत योग्य आहे? असा सवाल या पत्रातून विचारण्यात आला आहे.

शिष्टमंडळात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, अल्पसंख्याक मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदींचा समावेश होता.
सत्तार यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरावर निषेध होत आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.