Latest Marathi News

BREAKING NEWS

अब्दुल सत्तार हा थर्ड क्लास माणूस; त्या विधावरून खैरेंनी साधला निशाणा

0

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची पुन्हा एकदा जीभ घसरली राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या थराची टीकाच सत्तार यांनी केली. सत्तार यांच्या विधानामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काय म्हणाले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे – अब्दुल सत्तार हा थर्ड क्लास माणूस असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

अब्दुल सत्तार यांची माफी आणि नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांची हकालपट्टीच करायला हवी, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्व कसे काय सहन करतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही, असेही खैरे म्हणाले.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधान केल्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. ‘सत्तार यांचं हे संतापजनक वक्तव्य आहे, त्याचा निषेध करतो. सत्ता डोक्यात नाही गेली पाहिजे. आम्ही आता शांत आहोत पण कायमच शांत राहू अस नाही, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी थेट इशारा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.