Latest Marathi News

BREAKING NEWS

‘अब नही कोई बात खतरे की..’; फोटो शेअर करत राऊतांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनाही केलं टॅग

0

 

राज्यातील सत्तांतरानंतर संजय राऊत रोज ट्विटच्या माध्यमातून किंवा माध्यमांसमोर येत बंडखोर आमदार आणि भाजपला टोला लगावताना दिसतात. आता त्यांनी पुन्हा एक नवीन ट्विट केलं आहे. फोटोमध्ये संजय राऊत खुर्चीवर बसलेले आहेत तर त्यांच्या शेजारीच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे.

या फोटोला राऊतांनी कॅप्शनही दिलं आहे. यातून त्यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. राऊतांनी लिहिले आहे की, ‘अब नही कोई बात खतरे की, अब सभी को सभी से खतरा हैं..आपल्या या ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या दोघांनाही टॅग केलं आहे. यावरुनच हा या दोघांना आणि बंडखोर आमदारांनाही टोला आहे, हे स्पष्टपणे समजतं.

दरम्यान सोमवारी दुपारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत बाहेर आले आणि माध्यमांशी काहीही न बोलता निघून गेले. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं याबाबत चर्चा सुरू झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये खासदार आणि संजय राऊत यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहण्यास मिळालं.

Leave A Reply

Your email address will not be published.