जळगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाप्रोबधन यात्रा पार पडली.यावेळी शिवसेनेच्या सुषमा अंधारे आणि युवा सेनेचे नेते शरद कोळी यांनी शिंदे गटातील बंडखोर नेत्याला चांगलेच फटकारले. यावेळी कोळी यांनी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या बहीण वैशाली सूर्यवंशी यांचा शरद कोळी यांनी आमदार म्हणून उल्लेख केला. शिवसेनेच्या आणि वैशाली ताईच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर आल्यास तुम्हाला बारा बैलाचा नांगर लावल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, असेही शरद कोळी म्हणाले.
आमदाराचे बगलबच्चे काही गावात अन्याय करतात. अरे दादागिरी करायचे बंद करा . आम्ही दादागिरी केली तर तुला घराबाहेर पडणं बंद करावे लागेल. सांगून ठेवतो शिवसैनिकांच्या नादाला लागायचं नाही. बांडगुळांना वाटत असेल हे गप्प आहेत. पण, तसे काही नाही. हे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे आहेत, असे कोळी म्हणाले.
गद्दाराला याच मातीत गाळणार. वैशालीताई तुमचे वडील असते, तर गद्दाराला मुस्कळ्या हाणल्या असत्या. बहिणीला लई माया असते. वैशालीताईंच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर आल्यास तुम्हाला बारा बैलांचा चौऱ्या नांगर लावल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा कोळी यांनी बंडखोरांना दिला आहे.