सोलापूर |
जुळे सोलापूर येथील प्रभाग क्र २४ येथे गेली १५ वर्ष झाले पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या एक तास राष्ट्रवादी या कार्यक्रमा मध्ये नागरिकांनी व महिलांनी पिण्याच्या पाण्याच्या संधर्भात भरपूर तक्रारी केल्या त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर व मुसा अत्तार यांनी माजी पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे या विषयाचे निवेदन दिले त्यांनी तत्काळ महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना या संधर्भात तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
व आयुक्तांना १५ वे वित्त आयोग अंतर्गत निधी उपलब्ध करुन द्यावे असे आदेश दिले त्याप्रमाणे आयुक्त पी शिवशंकर यांनी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईनसाठी १ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन दिला, हि पाईप लाईन कुमठेकर हॉस्पिटल ते बनशंकरी माता मंदिर ते अंबा किराणा दुकान ते मिरा नगर ते मदनी नगर ते मिल्लत नगर ते वजीर नगर ते सिंधू विहार ते विजापूर रोड असे टाकण्यात येणार आहे यामुळे या भागातील लोकांचा महत्वाचा पाणी प्रश्न मिटणार आहे, या कामाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले या वेळी महेश गादेकर, शंकर पाटील, चंद्रकांत पवार, युवराज राठोड, प्रमोद भोसले, चेतन चौधरी, संपन्न दिवाकर, मिलिंद गोरे, ज्योतिबा गुंड, नागेश निंबाळकर, नारायण शिंदे, रमेश बेडगे, संतोष माळगुंडे, विजय गेंगाणे, चंद्रकांत सुतार, बावा साहेब शेख, हमीद शेख, शिराज मुल्ला, बादशाह मुजावर, यासीन निगेवान, मौला मुल्ला, शकील मुल्ला, रियाज गाडीवान, अंबिर शेख, मोशीन पटेल, इमरान शेख, विशाल झळके, सचिन गायकवाड आदी प्रभागातील महीला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.