Latest Marathi News

BREAKING NEWS

आमदार संतोष बांगर समर्थकाकडून महिला कार्यकर्त्याला शिव्या

0

 

मुंबई | सध्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात जोरदार शीतयुद्धे पेटलेले दिसून येत असून दिनाचं दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केला होता यावरून जोरदार वातावरण तापले होते अशातच युवासेनेच्या अयोध्या पोळी-पाटील यांनी यावर भाष्य केले होते.

युवा सेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ-पाटील यांना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांनी फोन करून धमकावणे अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर या प्रकरणात मुंबईच्या भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

अयोध्या पौळ पाटील यांनी सांगितलं की, मी याकडे दुर्लक्ष करत होते. पण, पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना सर्व प्रकाराची माहिती मिळाल्या नंतर त्यांनी मला पोलिसात तक्रार करण्यास सांगितले यांनतर मी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते योग्य कारवाई करतील. माझ्या सोबत पक्ष प्रमुख आणि माझे इतर वरिष्ठ नेते, शिवसैनिक सर्वजण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.