Latest Marathi News

BREAKING NEWS

75 वे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशात प्रथमच जुळे सोलापूरातील स्वामी विवेकानंद प्रशाला कडून पहाटे 3:30 वा चार पुतळा येथे तिरंग्यास मानवंदना दिली

75 वे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशात प्रथमच जुळे सोलापूरातील स्वामी विवेकानंद प्रशाला कडून पहाटे 3:30 वा चार पुतळा येथे तिरंग्यास मानवंदना दिली

0

75 वे अमृतमहोत्सवी निमित्त देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहे. 15 ऑगस्ट रोजी जुळे सोलापूर येथील शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला येथे एक आगळ्यावेगळ्या उपक्रम राबविले आहे. या उपक्रमात वय वर्षे 10 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुला मुलींचा सहभाग होता. प्रथमच देशात पहाटे 3:30 मिनिटाने स्वामी विवेकानंद प्रशालेच्या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या राष्ट्रीय धावपटू साईश्वर व श्रद्धा गुंटूकसह काही राज्य व राष्ट्रीय खेळाडू तसेच शाळेचे प्राचार्य चिदानंद माळी, प्राचार्य अंबादास पांढरे, क्रीडा प्रशिक्षक कृष्णा कोळी, यश आठवले, गौरव कांबळे, सिद्धू बिराजदार आदींच्या उपस्थितीत पार्क चौक येथील गौरवस्थान असलेले चार पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 24 फूट तिरंगेस मानवंदना देऊन 24 फुटाचा ध्वज हातात धरून 7.5 किमी अंतर धावत पार्क चौक, सात रस्ता मार्गे जुळे सोलापूरातील वसुंधरा महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे या रॅलीची सांगता मानवी साखळीने तयार केलेल्या भारतमातेच्या प्रदक्षिणा घालून करण्यात आली. 24 फूट तिरंगा घेण्याचे कारण म्हणजे भारतात देश रक्षणार्थ 24 तास तटस्थपणे उभारलेल्या जवान व 24 तास सक्रिय असणाऱ्या पोलीस बांधवांना मानवंदना म्हणून हा उपक्रम राबविण्यात आले होते.तसेच स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वात शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. तसेच विद्यार्थ्यांची साखळी बनवत भारतमातेचा नकाशा तयार केले. यासाठी कृष्णा कोळी, गौरव कांबळे, सिद्धू बिराजदार आदिंनी परिश्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन श्री. अविनाश भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका सौ. भिसे मॅडम, सौ. मेडपल्ली मॅडम यांनी केले. प्रास्ताविक प्रशालेचे शिक्षिका सौ. संगिता लोंढे, सौ. मोहिनी हिरेमठ यांनी केले. तर श्री. खरात सर यांनी आभार मानले. यावेळी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. दत्तात्रय पाटील, स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. चिदानंद माळी, वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्या मीना गायकवाड, क्रिडा प्रशिक्षक श्री. पाटील, ज्ञानज्योती प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. जे. डी. चव्हाण, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त दिलेली मानवंदना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.