Latest Marathi News

BREAKING NEWS

50 खोकेवाले कोणत्या झाडी डोंगरात लपलेत’; राज्यपाल विरोधात संजय राऊत आक्रमक

0

 

गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. यावेळी धडाधड चार ट्वीट करत राज्यपालांवर टीका केली आहे.

धडाधड चार ट्वीट करत राज्यपालांवर टीका केली आहे. राऊतांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

काय ती झाडी..काय तो डोंगर..काय नदी..आणि आता…काय हा मराठी माणूस ..महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत, असं राऊतांनी म्हटलं आहे. थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे… 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे, ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.