Latest Marathi News

BREAKING NEWS

शाळा सुरू होताच 250 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, वाचा कुठे घडला हा प्रकार

0

मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा सगळ्यात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अशातच तेथील शाळेत जाणाऱ्या मुलांना देखील कोरोनाने बाधित केल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील जॉर्जियामधील शाळेत केवळ एकाच आठवड्यात २५० विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

अटलांटाच्या चेकोरी काउंटी या शाळेने आपल्या वेबसाईटवर याची माहिती दिली आहे. शुक्रवारपर्यंत पहिली ते बारावी वर्गातील ११ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. फक्त आठच दिवसात कोरोनाचा कहर इतका वाढला की लागण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल २५० वर गेली आहे. दरम्यान सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना १४ दिवसांसाठी आयसोलेट करण्यात आले आहे. या सर्वांना ऑनलाइन सूचना देण्यात येतील.

ज्या ठिकाणी या विद्यार्थी आणि शिक्षकांना लागण झाली आहे, त्या ठिकाणी ४० शाळा आणि स्टडी सेंटर आहेत. जिथे ४२,२०० विद्यार्थी आणि ४८०० कर्मचारी कार्यरत आहेत.

शाळेतील अधीक्षक ब्रायन होईटवर यांनी शुक्रवारी संबंधित परिवारांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची रोज कोरोना टेस्ट होणार आहे. महामारीच्या काळात शाळा चालवत असल्या कारणाने अतिरिक्त सुरक्षेचे उपाय केले जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.