Latest Marathi News

BREAKING NEWS

2019 मध्ये भाजपने शिवसेनेचे 30 उमेदवार पाडले, संजय राऊतांचा केसरकरांवर पलटवार

0

 

सामनाच्या रोखठोक मधून शिवसेना नेते संजय राऊतांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर चांगलाच पलटवार केलाय.2019मध्ये भाजपने शिवसेनेचे 30 उमेदवार पडले असं सामनाच्या रोखठोक मध्ये संजय राऊत म्हणालेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांना अचानक हिंदुत्वाचा आणि भाजपचा पुळका कसा आला हे समजण्यासारखं आहे असंही ते म्हणालेत.

2019 ला केसरकारांविरोधात भाजपने राजन तेली नावाचा बंडखोर उभा केला होता. भाजपने बंडखोरांना बळ दिलं आणि याच कारणामुळे शिवसेनेचे तब्बल 30 उमेदवार पडले, शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी व्हावी व मुख्यमंत्रीपदावरील शिवसेनेचा दावा कमजोर व्हावा यासाठीच ही खेळी होती असं संजय राऊत रोखठोकमध्ये म्हटलेत. शिवाय शिंदे गटात सामील झालेल्यांपैकी असे किमान 17 आमदार असतील ज्यांना भाजपने पडण्याचा प्रयत्न केलाय हेही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.

दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांना अचानक हिंदुत्वाचा आणि भाजपचा पुळका आला हे समजण्यासारखे आहे, पण केसरकर ज्या सावंतवाडी मतदारसंघातून 2019 ला निवडून आले तेथे भाजपबरोबर युती असतानाही केसरकरांविरोधात राजन तेली हा बंडखोर भाजपने उभा केला होता व त्यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वतः आले.

2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे 30 उमेदवार भाजपने बळ दिलेल्या बंडखोरांमुळे पडले. शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी व्हावी व मुख्यमंत्रीपदावरील शिवसेनेचा दावा कमजोर व्हावा यासाठीच ही खेळी होती. शिंदे गटात आज सामील असलेल्या किमान 17 आमदारांना भाजपने सरळ पाडण्याचे प्रयत्न केले हे सत्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.