Latest Marathi News

BREAKING NEWS

12 हजार कर्मचाऱ्यांना गुगलचा दाखवणार बाहेरचा रस्ता

0

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या दहा हजार कर्मचाऱ्याना काढून टाकल्याच्या बातमीमुळे टेक्नोलॉजी क्षेत्रात खळबळ उडाली होती. ही बातमी ताजी असतानाच गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने आपल्या कंपनीतील जगभरातील सहा टक्के नोकरकपात करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. त्यानुसार कंपनी तब्बल 12 हजार कर्मचाऱ्याना नारळ देण्याच्या तयारीत आहे.

कर्मचाऱ्याना पाठवलेल्या ई-मेलमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी म्हटलंय, ‘आम्ही घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेतोय. एकूण खर्चाचे नियोजन आणि पुढील तयारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्याना दोन महिन्यांचा नोटीस कालावधी असेल अथवा 60 दिवसांचा पगार दिला जाईल.’जगभरात मंदीचे सावट आणि महागाई असल्याने नुकसान टाळण्यासाठी यापूर्वीदेखील अनेक बडय़ा कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

ट्विटर, नेटफ्लिक्स, मेटा, अॅमेझॉन, शॉपिफाय आदी कंपन्यानी कर्मचारी वर्गाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यापूर्वी ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ‘स्विगी’ने शुक्रवारी आपल्या 380 कर्मचाऱ्याना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. फूड डिलीवरी क्षेत्रात ग्रोथ रेट मंदावल्यामुळे नफा कमी झाला आहे. त्यामुळे कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. तसेच प्रमाणापेक्षा अधिक कर्मचाऱ्याची भरती हेदेखील नोकरकपातीचे मुख्य कारण असल्याचे ‘स्विगी’ने म्हटलेय.

Leave A Reply

Your email address will not be published.