Latest Marathi News

BREAKING NEWS

स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे, चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

0

मुंबई |

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांच्या अडचणी संदर्भात मुंबई विद्यापीठात बैठक घेतली. स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकरी आणि उद्योजकतेच्या अधिक संधी उपलब्ध होतील. यावेळी विद्यापींठानी आपली सूची तयार करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, वैद्यकीय शिक्षण आणि कृषीविषयक शिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू करण्यातबाबत सबंधित विभागाच्या मंत्री महोदयांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. विद्यापीठाच्या जागेबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. या विद्यापीठांसाठी गठीत केलेल्या समितीने पुढील अधिवेशनापूर्वी अहवाल सादर करावा..तसेच विद्यापीठांच्या कुलगुरू यांची निवड विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या नियमाप्रमाणे करावी, अशा सूचना देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीत स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाबाबतचा कायदा व विद्यापीठाच्या अडचणी, विद्यापीठावरील नियंत्रण, नॅक मूल्यांकन कालावधी, शुल्क रचना या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या अडचणीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

या बैठकीस आमदार सतेज पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाचे कुलगुरू तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.