Latest Marathi News

BREAKING NEWS

“सोलापूर तापमानाचा पारा चाळीशीच्या घरात…!”

0

सोलापूर |

अवकाळी पावसाचे वातावरण थांबल्यानंतर आता उन्हाळ्याचे तीव्रता झपाट्याने वाढू लागली आहे. मागील चार दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. मंगळवारी ३९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर आज सकाळी नऊपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे.

सोलापूर शहर आणि परिसरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाळा कडक राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मागील चार दिवसांपासून तापमानाच्या पाऱ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

काल ४० च्या घरात तापमान गेल्याने नागरिकांच्या परेशानीत वाढ झाली आहे. नागरिकांनी घराबाहेरील कामे सकाळी व सायंकाळनंतरच करावीत. दुपारी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. आज सकाळी नऊपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. प्रत्येकजण उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काळजी घेताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.