Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापूरच्या माजी पालकमंत्र्यांना सायबर चाच्यांनी लावला लाखाचा चुना

0

सोलापूर |

शहर उत्तर मतदारसंघाचे आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना क्रेडिट कार्ड नूतनीकरण करावयाचे आहे असे सांगून ओटीपी विचारुन एक लाख रूपयांचा गंडा घालण्यात आलाय. चक्क आमदाराच्या बँक खात्यातून एक लाख रुपये काढून घेण्याची शक्कल सायबर चोरांनी लढवल्यानं सर्वांच्याचं भुवया उंचावल्या आहेत.ही घटना २३ जुलैला म्हणजे दोन महिन्याखाली घडली आहे. यावर सायबर सेलकडे तक्रार देण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरूच आहे. त्यात कोणतीच प्रगती झालेली नाही.

याप्रकरणी आमदार देशमुख यांचे स्वीय सहायक उमेश कोळेकर यांनी पोलिस आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यानंतर सायबर सेल पोलिसांकडे अर्ज केला आहे.दीड-दोन महिन्यांपासून या घटनेची अजून चौकशीच सुरू आहे. गुन्हाही दाखल झाला नाही.आरोपींचा शोधही लागला नाही.याला आमदार देशमुख यांच्या कार्यालयातून दुजोरा मिळाला. आमदार विजय देशमुख यांना ‘एसबीआय कस्टमर केअरमधून बोलत आहे, आपले क्रेडिट कार्ड नूतनीकरण करायचे आहे, आपल्या मोबाइलवर ओटीपी कोड येईल तो आम्हाला सांगा’ असे सांगून हा फोन कॉल बँकेतून आहे असे समजून आमदार देशमुख यांनी ओटीपी सांगितला. कांही वेळातच त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये वळते झाले. त्यांना मेसेज आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता, ‘बँकेतून अशा प्रकारे कोणी आपल्याशी संवाद केला नाही’, असे सांगण्यात आले. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

याबाबत सायबर सेलचे पोलिस निरीक्षक सय्यद यांना विचारले असता, ‘मी कामानिमित्त परगावी आहे.याबाबत नेमका तक्रार अर्ज, तपासाची काय स्थिती आहे याची माहिती आज देणार असल्याचे म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.