Latest Marathi News

BREAKING NEWS

सोमय्या व राऊतांच्या वादात आयएएस नार्वेकरांची एन्ट्री

0

मुंबई |

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा शौचालय घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला होता. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करुन शौचालय निर्माण केले असाही आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.

संजय राऊत यांचे व्याही आयएएस अधिकारी राजेश नार्वेकर यांनीच याप्रकरणी क्लिनचिट दिल्याचा दावा किरीट सोमय्या केला आहे. “संजय राऊत यांच्या मुलीच्या सासरे आयएएस अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आम्हाला, युवक प्रतिष्ठानला नोटीस दिली. निर्दोष असल्याचे सगळी कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस दिल्यानंतर त्यांनी आम्हाला क्लिन चीट दिली. संजय राऊत तुमच्या व्याहींनी आम्हाला क्लिनचीट दिली आहे. 100 कोटींच्या घोटाळ्यात युवक प्रतिष्ठानची चूक नाही. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजेश नार्वेकर यांच्यावर आरोप करावेत. राजेश नार्वेकर विकले गेल्याचा आरोप त्यांनी करुन दाखवावा, ” असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.