मुंबई |
अनेक दिवसांपासून वादात राहिलेला ‘हर हर महादेव’
चित्रपट आज टिव्हीवर प्रदर्शित होत आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, माझा विरोध निर्मात्याला नाही किंवा दिग्दर्शकालाही नाही. कुणी सिनेमा काढला त्यांनाही नाही. माझा फक्त सिनेमॅटिक लिबर्टिच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करण्याला विरोध आहे.
नेमकं काय म्हटलं संभाजीराजे यांनी?
संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवण्यास विरोध आहे. जो इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जातो तोच इतिहास नवी पिढी खरी मानणार. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. ऐतिहासिक चित्रपटाचे पाहिले स्क्रिनिंग महाराष्ट्रात व्हावे आणि त्यासाठी एक समिती निर्माण
व्हावी अशी मागणी छत्रपती संभाजी महाराज यांनी केली
आहे.
तर ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत मी चुकीची भूमिका घेतो आहे असं मला कोणी सांगावं, त्यानंतर मी पुन्हा या चित्रपटावर कधीही भाष्य करणार नाही असंही यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबतची संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवण्यास माझा विरोध आहे असं त्यांनी स्पष्टपणे संगितल आहे. पुढे ते म्हणाले की चित्रपटात मुख्य भूमिका सकारणारे
अभिनेते सुबोध भावे यांनी सांगावं की मी चुकीचा आहे.
किंवा माझी मागणी चुकीची आहे. समोर येऊन त्यांनी
मला सांगावं असं आव्हानही संभाजीराजे यांनी दिलं आहे.