Latest Marathi News

BREAKING NEWS

“साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष करु…! – रोहित पाटील

0

मुंबई |

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष करु असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात साहेबांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी काम करणार असल्याचे रोहित पाटील म्हणाले.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून राष्ट्रवादी पक्षांमध्ये उभी फुट पडली आहे. आज मुंबईमध्ये शरद पवार यांना समर्थन देण्यासाठी रोहित पाटील गेले होते त्यावेळी ते बोलत होते. सामान्य माणूस ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याचे पाटील म्हणाले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन केलं आहे. यावेळी रोहित पाटील बोलत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.