Latest Marathi News

BREAKING NEWS

सावरकरांची जनमानसात असणारी प्रतिमा मलिन करण्यासाठीच राहुल गांधींतर्फे सावरकर यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे- चंद्रकांत पाटील

0

पुणे |

काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या विधानावरून मागील दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. हिंगोलीतील भारत जोडो यात्रेच्या सभेत राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. राहुल गांधी यांच्या विधानावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काँग्रेस मान्य करायला तयार नाही. त्यामुळेच सावरकरांच्या उत्तुंग कार्याबद्दल जनमानसात असणारी प्रतिमा मलिन करण्यासाठीच राहुल गांधींतर्फे सावरकर यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितले आहे कि, वीर सावरकरांची कोणत्याही प्रकरची बदनामी, चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणार नाही. शिवसेनेच्या या भूमिकेवर चंद्रकांत पाटील यांनीं माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले कि, सावकारांचे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक मोठे योगदान आहे, याबद्दल काँग्रेसची असहमती आहे. एकदा का एखाद्या व्यक्तीची इमेज डाऊन करायची असेल , जी इमेज लोकांच्या मनात खूप मोठी आहे. त्यासाठी अशा प्रकारचे काहीना काही स्टेटमेंट्स ते करत असतात. असे स्टेटमेंट काँग्रेस ज्या ज्या वेळेला द्यायची त्या त्या वेळी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांना बोलायचे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, मधल्या काळात सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरे अशा विषयांमध्ये शांतपणे भूमिका घेत होते. आता या गेल्या आठवड्यात मात्र राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याच्याशी शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी असहमती दर्शवली, सावरकरांबद्दल श्रद्धा व्यक्त केली याचे मी स्वागत करतो,असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याच स्पीड ने त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाशी संबंधित सगळ्या भूमिका घेतल्या तर महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिकांना याचा आनंद होईल, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.