Latest Marathi News

BREAKING NEWS

“समाजातील वंचित नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घ्यावी” – चंद्रकांत दादा पाटील

0

पुणे |

भाजपा पुणे शहरच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. पुण्याची पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सेवा, संघर्ष, संघटनवर कार्यकर्त्यांनी भर देऊन देऊन काम करावे, समाजातील वंचित नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घ्यावी, असे आवाहन हि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

चंद्रकांत दादा पाटील बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकासाभिमुख कामे करण्याचा प्रयत्न करू, सर्व समाज घटकाला सोबत घेऊन काम करण्यासाठी ही भाजप प्रयत्नशील आहे.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, धीरज घाटे, गणेश बिडकर, माजी मंत्री सुनील कांबळे, माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.