मुंबई |
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन आले. राऊतांना फोनवरून धमकी मिळाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन आले. राऊतांना फोनवरून धमकी मिळाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचेनेते शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.