Latest Marathi News

BREAKING NEWS

श्रध्दा वालकरचा खुन खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा केंद्रसरकारशी समन्वय साधून नराधम खुन्याला फासावर लटकवा – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

0

नागपूर |

“कोंबडीचे पस्तीस तुकडे करताना सुध्दा दहा वेळा विचार केला जातो, इथं तर मुलीचे पस्तीस तुकडे करण्यात आले आहेत. हे खूप वेदनादायी आहे, श्रध्दा वालकरचा खून ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे. श्रध्दाच्या खुनाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, केंद्र सरकारशी, केंद्रीय गृहमंत्र्यांशी समन्वय साधून नराधम खुन्याला तातडीने फासावर लटकवा,” अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात आज केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, श्रध्दा वालकरचा खून ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. कोंबडीचे पस्तीस तुकडे करताना सुध्दा दहा-दहा वेळा विचार केला जातो. इथं तर मुलीचे तुकडे करण्यात आले आहेत. ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे. हे खून प्रकरण आता दिल्ली पोलीसांच्या, केंद्राच्या अखत्यारित आहे. मात्र उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी केंद्राशी समन्वय करावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी स्वत: बोलावे. हा खूनाचा खटाला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा. नराधम खुन्याला तातडीने फासावर लटकविण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.