Latest Marathi News

BREAKING NEWS

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याची तक्रार येता कामा नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याची तक्रार येता कामा नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ग्लोबल न्यूज: खरीप हंगामामध्ये बी बियाणे यांचा तुटवडा पडू देऊ नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच बोगस बियाणाच्या प्रकारात कडक शिक्षा होईल हे पहा, कोणत्याही परिस्थितीत विशेषत: राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कृषी खरीप हंगाम कामांचा आढावा व बी बियाणे, खते, किटकनाशके, पीक कर्ज वाटप, कापूस, तुर व धान खरेदी बाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते. खरीप हंगामासाठी 43.50 लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती त्यापैकी 40 लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे. याशिवाय 50 हजार मेट्रिक टन युरियाचं संरक्षित साठा करण्यात येत आहे.

पीक कर्ज वाटपाला गती द्यावी
यावेळी बोलताना कृषी मंत्री दादा भुसे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की पीक कर्ज वाटपाला अधिकाधिक गती देण्याच्या सुचना यंत्रणेला देण्यात आल्या असून बँकांच्या संपर्कात अधिकारी आहेत. यावेळी प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून एकूण 46 टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांकडून 7 टक्के पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी 6250 कोटी तर राष्ट्रीयकृत बँकांनी 2300 कोटी रुपये पीक कर्ज वाटप केल्याचे त्या म्हणाल्या. बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचा 22 मेचा शासन निर्णय पोहोचविणे सुरू असून शेतकऱ्यांना पिक कर्जात अडथळा येऊ नये अशा सूचना दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.