Latest Marathi News

BREAKING NEWS

शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

0

बार्शी |

शिक्षण शास्त्र महाविद्यालय,बार्शी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर कालावधी 1 जानेवारी ते 7 जानेवारी 2022-23 “युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास”दिनांक 2 जानेवारी 2023,वार सोमवार रोजी उपळाई ठोंगे येथे किसान कामगार विद्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.एम.एस.डिसले यांनी केले. त्यामध्ये त्यांनी आजच्या युवकासमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान,कृषी व जल व्यवस्थापन मार्गदर्शन, वृक्षारोपण,सक्षम दिवस-बालविवाह प्रतिबंध उपक्रम, रक्तदान व मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर,नवीन मतदार नोंदणी आधार कार्ड जोडणी उद्बोधन,ग्रामीण किंवा शहरी भागाचा सर्वांगीण विकासात युवक- युवतींचे योगदान,महिला बचत गटांसाठी अर्थसाक्षरता उद्बोधन,व्यसनमुक्ती जनजागृती इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत असे सांगितले.

त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.त्यानंतर अध्यक्षांच्या उपस्थितीत मान्यवरांचा स्वागत समारंभ करण्यात आला.त्यानंतर कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या के.टी. एस.परीक्षा मध्ये प्रथम क्र.पाटील मंजुषा, द्वितीय क्र. कापसे अक्षय व तृतीय क्र.शिंदे प्रतीक यांना गुलाब पुष्प देऊन अध्यक्षांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यानंतर बी.एड.स्वयंसेविका वाघमारे सुजाता यांनी आपले मनोगत व्यक्त केले व व्हळे सुशील सर यांनी ‘इंग्रजी भाषा संवाद कौशल्य’ याबाबत माहिती सांगितली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे खजिनदार जयकुमार कुमार शितोळे येथे उपस्थित होते.तसेच अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर एस एस गोरे हे होते.कार्यक्रमाला उपस्थित किसान कामगार विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एस.शेळके हेही होते. तसेच प्रा.डॉ.एस.डी. भिलेगावकर हेही उपस्थित होते.

यानंतर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जयकुमार शितोळे यांनी सर्व एन.एस.एस स्वयंसेवक व स्वयंसेविका तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यामध्ये त्यांनी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सात सूत्रांचा संकल्प सांगितला.त्यानंतर अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.गोरे यांनी केला व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बी.पी.एड प्राध्यापिका स्मिता सुरवसे यांनी केले.यावेळी या कार्यक्रमाला डॉ. ए.जी.कांबळे सर कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.एम.एस.डिसले, बी.एड.प्रा.डॉ.पी.ए.पाटील, एम.एड.विभाग सहाय्यक प्राध्यापक शुभम तकिक हे उपस्थित होते.तसेच सर्व एन.एस.एस. स्वयंसेवक-स्वयंसेविका, किसान कामगार विद्यालय येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पाटील ज्ञानेश्वरी व कु. देवयानी शेळके यांनी केले.कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

अशाप्रकारे विशेष श्रमसंस्कार शिबिर 2022-23 उद्घाटन समारंभ मौजे उपळाई(ठोंगे)येथील किसान कामगार विद्यालय येथे पार पाडण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.