मुंबई |
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने निकाली काढला. शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह
देण्यात आले आहे. तसेच शिवाय ‘शिवसेना’ हे नाव देखील शिंदे गटाला देण्यात आले. त्यानंतर शिंदे गटाने विधीमंडळा तील कार्यालय ताब्यात घेतलं. आता विधानसभेपाठोपाठ संसदेतीलही कार्यालयही शिंदे गटाकडे गेल्याने आणखी एक धक्का ठाकरे गटाला बसला आहे.
एकनाथ शिंदे यांच शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमयरित्या वळण मिळत गेले. बंडानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होत शिंदे -फडणवीस अशी युती झाली. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह याबाबत वाद निर्माण झाला. त्यानंतर तो वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला. अखेर शुक्रवारी (दि. १७) निवडणूक आयोगाने निर्णय दिला की, “शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच शिवाय ‘शिवसेना’ हे नाव देखील शिंदे गटाला देण्यात आले. दरम्यान विधानसभेपाठोपाठ संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालयही शिंदे गटाकडे गेले. याबाबत लोकसभा सचिवालयाच्या उपसचिवांकडून अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. लोकसभेच्या उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी राहुल शेवाळेंना याबाबत माहिती दिली आहे.