नागपूर |
हिवाळी अधिवेशनात सभागृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदवी अभ्यासक्रमात केलेल्या बदलांमुळे विद्यार्थी बहुगुणी होण्यास कशी मदत होईल. केवळ करिअरचाच विचार नसून त्याचसोबत कला, योगासनं इत्यादी विषयांचंही स्वखुशीनं शिक्षण घेता येऊ शकेल, याची योग्य माहिती दिली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, नव्याने ४ वर्षाच्या डिग्रीमध्ये काय आलं तर ७० टक्के अभ्यासक्रम हा त्याला नोकरी आणि करिअरसाठी तर ३० टक्के अभ्यासक्रम हा म्युसिक , योगा, मेडिटेशन, स्पोर्ट्स अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी मिळून हि चार वर्षाची डिग्री होईल. विद्यार्थ्यांना ७० टक्के अभ्यासक्रम नोकरी साठी तर मिळाला, आणि इतर ३० टक्क्यामधून तो व्हर्सटाईल होईल.
अशा प्रकारचे प्रयोग करण्यामध्ये जी छोटी कॉलेजेस आहेत त्यांना मर्यादा येतात त्यामुळे जे धोरण वसंत दादांनी ८२ साली केलं कि कॅपिटेश फी वरती कायदा आणला त्यामधून डोनेशन नावाचा विषय संपला आणि मॅनेजमेन्ट तयार झाली. त्यावरही रिस्ट्रिक्शन आली. मँनेजमेन्ट सीटवरसुद्धा आता ऍप्लिकेशन करावं लागतं. अभ्यासक्रमाचे, परीक्षापद्धतीचे स्वातंत्र्य दिल तर थोडी व्हर्सटाईल मुलं तयार होतील , असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.