बार्शी |
रियल इस्टेट व्यवसायामध्ये असणाऱ्या प्रशांत मठपती यांच्या मुलगा ओम प्रशांत मठपती यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत मठपती व त्यांच्या पत्नी शमा मठपती या दांपत्याच्या हस्ते १ एप्रिल रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाची पूजन करण्यात आले. प्रशांत मठपती हे बार्शी शहरांमध्ये गेल्या काही वर्षापासून रियल इस्टेट एजंट म्हणून काम करतात. त्यांच्या पत्नी शमा मठपती सुलाखे कॅम्पुटर सेंटरमध्ये शिक्षक म्हणून काम करत असून ऑनलाईन साडी बेकरी क्षेत्रातील ‘शिवशाही नेटवर्क’ च्या बार्शी तालुक्यातील लीडर आहेत. मठपती कुटुंबीयांचा अनेक सामाजिक उपक्रमातही सहभाग असतो.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण प्रशांत मठपती व शमा या दाम्पत्यांने केले. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये विविध उपक्रमही राबवले जातात. ग्रामीण भागातील गाळ काढण्यापासून ते थोरा-मोठ्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केली जाते.