मुंबई |
इंग्लंडचा राजा रिचर्ड II आणि बोहेमियाची राणी ॲनी यांनी त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. एंगेजमेंटची तारीख ३२ मार्च ठेवण्यात आली होती. ही बातमी ऐकून लोकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
मात्र, जेव्हा लोकांचं सेलिब्रेशन करून झालं, तेव्हा त्यांना कळलं की कॅलेंडरमध्ये ३२मार्च अशी कोणतीही तारीख नाही.
त्यावेळी राजा रिचर्ड आणि राणी ॲनी यांनी आपली मस्करी केली आणि मूर्खात काढलं, असं लोकांच्या लक्षात आलं. आता ३२ तारीख नसते म्हणजे ती तारीख झाली १ एप्रिल, तर तेव्हापासून एप्रिल फूल डे साजरा करण्यास सुरुवात झाली.