Latest Marathi News

BREAKING NEWS

“राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महिला बचत गट अर्थसाक्षरता उद्बोधन कार्यक्रम संपन्न…!”

0

बार्शी |

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, संलग्नित श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी .अंतर्गत” विशेष श्रमसंस्कार शिबिर “१ जानेवारी ते ७ जानेवारी २०२३ या कालावधीत राबवले जात आहे . या शिबिराचा मुख्य विषय युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास असा आहे.

आज दिनांक ६ जानेवारी वार शुक्रवार रोजी सकाळी “महिला बचत गटासाठी अर्थ साक्षरता उद्बोधन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब भालेराव व श्रीमती विभावरी या होत्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयंसेविका शितल जिरेकर यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे बाबासाहेब भालेराव व श्रीमती विभावरी यांनी मार्गदर्शन केले. महिलांना वेगवेगळ्या योजना व महिला बचत गटातील व्यवसाय याविषयीची माहिती सांगितली. यानंतर ग्रामसेवक सुतार सुनील सर यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे आभार स्वयंसेविका प्रतिज्ञा भदेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका रूपाली जाधव व बाराते सायली यांनी केले .यावेळी कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ सर्व स्वयंसेवक -स्वयंसेविका उपस्थित होते. अशाप्रकारे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महिला बचत गट अर्थसाक्षरता उद्बोधन हा कार्यक्रम पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.