Latest Marathi News

BREAKING NEWS

पत्रकार दिनानिमित्त मल्टीकोर क्रिएशनच्या कार्यालयामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन..!

0

बार्शी |

मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त बार्शी शहरात मल्टीकोर क्रिएशन कार्यालयामध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मल्टीकोर क्रिएशन व लिओ क्लब ऑफ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित कंकूलोळ हे होते. यावेळी व्यासपीठावर मुरलीधर चव्हाण, संतोष सूर्यवंशी,प्रदीप माळी, विजय कोरे, लिओ क्लबचे अध्यक्ष यश मेहता व स्वराज लोखंडे उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये प्रिंट मीडिया पत्रकार, डिजिटल मीडिया पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकार व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला पत्रकार बांधव उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार समाजातील अनेक समस्या मांडतात अनेक गोष्टींना वाचा फोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांची प्रश्न मार्गी लावण्यासाठी व त्यांच्या हितासाठी आपण काम करणार असल्याची ग्वाही यावेळी बोलताना व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे राज्य सहसचिव अमित इंगोले यांनी दिली. याचबरोबर माहिती तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे मोठा बदल होत आहे तो लक्षात घेऊन पत्रकारांनी सामाजिक समाजाभिमुख पत्रकारिता करावी असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमांमध्ये पत्रकार शहाजी फुरडे, संतोष सूर्यवंशी, प्रदीप माळी, मल्लिकार्जुन धारूरकर व विजय कोरे यांच्यासह अन्य पत्रकारांनी आपले विचार मांडले. पत्रकारितेला नवी दिशा देणार असल्याचे प्रतिपादनही करण्यात आले. महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया चा पत्रकारांसाठी ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी संघटनेची स्थापना केली आहे, याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या एकत्र करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम जोमाने सुरू आहे.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक लिओ क्लबचे सचिव स्वराज लोखंडे, सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन अमित इंगोले यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.