Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यात लवकरच मोठा भूकंप, NCP च्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

0

बीड |

सध्या महाराष्ट्रात जी चर्चा सुरुय ते नक्की होणारचं आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी केला आहे. माझ्या ३५ वर्षाच्या राजकारणाचा अनुभव यावरून मी हे सांगत आहे असंही प्रकाश सोळुंके म्हणाले. बीडच्या माजलगाव मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर भाजप महाराष्ट्रात काही ना काही चमत्कार करेल. त्यामुळे अजित दादांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही काहीतरी शिजत असल्याचे संकेत राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिले आहेत. गेल्या आठ दिवसापासून दररोज नव्या नव्या बातम्या समोर येत आहेत त्यातच प्रकाश सोळंके यांनी भर घातली आहे. या अगोदरच विरोध पक्ष नेते अजित पवार यांनी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीमध्येच राहणार असेही माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.